नेपाळचे पंतप्रधान झालानाथ यांचा राजीनामा!

वेबदुनिया

सोमवार, 15 ऑगस्ट 2011 (11:37 IST)
देशातील विविध राजकीय पक्षांच्या दबावामुळे नेपाळचे पंतप्रधान झालानाथ खनाल यांनी आज राजीनामा दिला. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा राजकीय संकट निर्माण झाले आहे.

सीपीएन युएमएल पक्षाचे नेते असलेले झालानाथ खनाल यांनी तीन फेब्रुवारीला पदग्रहण केले होते. या पदासाठी तब्बल 17 वेळा निवडणूक झाली होती. माओवादी नेते व प्रतिस्पर्धी उमेदवार प्रचंड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांची एकमुखाने निवड झाली होती. देशात 2006 मध्ये सुरू केलेली शांतता प्रक्रिया, घटना तयार करण्यात ते असमर्थ ठरल्यामुळे त्यांना पदत्याग करावा लागला. प्रमुख विरोधी पक्ष नेपाळी कॉंग्रेस, माओवादी आणि टेरी मदेशी आघाडीने त्यांच्यावर पदत्यागासाठी दबाव आणला होता. त्याअंतर्गत त्यांनी आज राजीनामा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा