चीनला वेगळे पाडण्याची भारताची इच्छा नाही!

WD
वॉशिंग्टनस्थित 'फॉरेन पॉलिसी इनीशिएटिव्ह' या वैचारिक मंडळाकडून आयोजित एका परिसंवादात निरुपमा राव म्हणाल्या, की आशिया प्रशांत क्षेत्रात चांगले संबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान चीनला एकटे पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.

या क्षेत्रात सुरक्षाव्यवस्थेबाबत आमचे स्पष्ट मत आहे, की हे क्षेत्र खुले, समग्र आणि नियमआधारित असावे. कोणत्याही करणावरून अडथळे निर्माण होण्याऐवजी संवादाची प्रक्रिया मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, असेही आमचे मत आहे. या परिसंवादात अमेरिकेतील ऑस्ट्रेलियाचे राजदूत किम बेजले, पॅलेस्टाईन राजदूतातील वरिष्ठ अधिकारी मारिया ऑस्ट्रिया हेसुद्धा हजर होते.

निरुपमा पुढे म्हणाल्या, की जागतिक शक्तीचे केंद्र आता आशिया प्रशांत क्षेत्राकडे स्थानांतरित होत आहे. भारत नेहमीच या क्षेत्राचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा राहिला आहे. आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसोबत चांगले संबंध असल्याचा आमचा इतिहास आहे.

वेबदुनिया वर वाचा