भारत देशाचे देशाचे राष्ट्रगीत "जन-गण-मन" हे नोबेल पारितोषिक विजेता रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिले आहे.
२७ डिसेंबर १९११ रोजी राष्ट्रीय कोंग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले.
ह्या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
देशभरांत म्ह्टले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे.
राष्ट्रगीत गाण्याचे नियम
राष्ट्रगीत गाताना किंवा ऐकताना सावधान स्थितीतच उभे राहून राष्ट्राला वंदन करुनच हे गीत म्हणावे.
राष्ट्रगीताचे उच्चारण स्पष्ट असावे.
राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय 52 सेकंदात म्हणायचे असते.
काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी 20 सेकंद आहे.
राष्ट्रगीत गाताना त्याचा अपमान व निंदनीय प्रकारचे कृत्य करणे कायदयान्वये गुन्हा आहे.
हेतूपूर्वक राष्ट्रगीत गाण्यार्यांना थांबवणे किंवा समूहातील गाण्यात व्यत्यय आणणे गुन्हा आहे.