देशाचा ६१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असताना आता आपण प्रांतीयतावादाच्या रूपाने विघटनाकडे तर वाटचाल करत नाही ना? याचा विचार करायची वेळ आली आहे.
देशात प्रादेशिक अस्मिता पुढे करून अनेक आंदोलने उभी केली जात आहेत. काही जुनी आहेत. काही नव्याने सुरू झाली आहेत. पण सगळ्या राज्यात अशी आंदोलने सुरू आहेत. ६१ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर याच प्रश्नाला हात घालण्याचे वेबदुनियाने ठरविले. 'प्रांतीयवादी आंदोलनातून देशाची विघटनाकडे वाटचाल सुरू झाली आहे काय?' या विषयावर आम्ही एक सेमिनार घेतला असून त्यात अनेक मान्यवरांना सहभागी करून घेतले आहे. यात महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराती, माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, भाजपचेच प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ खडसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व आमदार बाळा नांदगावकर, याच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितीन सरदेसाई हे मान्यवर यात सहभागी झाले आहेत. या सगळ्यांची मते आपल्याला येथे वाचायला मिळतील.
या नेत्यांच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा.