पॉप स्टार लेडी गागा आता गायनानंतर अभिनय क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी ती अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेत आहे. डेली स्टार ऑनलाईच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय गागा हॉलिवूडमध्ये अभिनय करण्यासाठी प्रशिक्षर घेत आहे. ती जस्टिन टिंबरलेक आणि रिहानासारख्या संगीतकारांच्या पावलावर पाऊल ठेव इच्छिते, ज्यांनी संगीताच्या क्षेत्रानंतर रुपेरी पडद्यावर यशस्वी पदार्पण केले.