वृत्तानुसार, म्युझिक बँड सुपरट्रॅम्पने त्यांचे सह-संस्थापक रिक डेव्हिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे.म्युझिक बँड सुपरट्रॅम्पने म्हटले आहे की, 'रिक डेव्हिस यांच्या निधनाची घोषणा करताना खूप दुःख होत आहे. 5 सप्टेंबर रोजी दीर्घ आजारानंतर रिक यांचे लॉंग आयलंड येथील त्यांच्या घरी निधन झाले. आम्हाला त्यांना जाणून घेण्याची आणि पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.'