आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडण्याच्या तिच्या समर्पणाचे प्रतीक मानलं जातंय.
सनी लिओनीचा फर्स्ट लुक मधून तिचा अतूट आत्मविश्वास रेड कार्पेट वर दिसतो. तिने डिझायनर मारिया कोखियाचा मनमोहक वन-शोल्डर मॉस ग्रीन सॅटिन ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये तिच्या मिड्रिफवर स्ट्रॅटेजिक कट अफलातून दिसतोय.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सनी लिओनचा चित्रपट "केनेडी" कान्स चित्रपट महोत्सवात मध्यरात्रीच्या प्रतिष्ठित प्रदर्शनासाठी निवडला गेला आहे, ज्यामुळे हा सन्मान मिळवणारा हा एकमेव भारतीय चित्रपट बनला आहे. सनी लिओनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करते आणि जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर छाप पाडते.