‘ग्रॅव्हिटी’वर उडय़ा

शनिवार, 8 मार्च 2014 (16:07 IST)
साय-फाय स्पेस ड्रामा म्हणून अनेकांनी आधी ‘ग्रॅव्हिटी’कडे पाठ फिरवली होती. तरीही अनेकांनी हा केवळ थ्रीडी सिनेमा असल्याने थिएटरमध्ये जाऊन या स्पेस मेलोड्रामाचा अनुभव घेतला. 
 
मात्र या सिनेमाला सात ऑस्कर मिळाल्याची बातमी येऊन थडकली आणि ग्रॅव्हिटीबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 
 
‘ग्रॅव्हिटी’ पाहण्यासाठी सिनेप्रेमींबरोबरच सर्वसामान्य प्रेक्षकांचीही एकच धडपड सुरू झाली आहे. मुळात हा सिनेमा 2013 मधला सर्वाधिक बॉक्सऑफिस कलेक्शन करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. या सिनेमाने जगभरात सातशे दशलक्ष डॉलर्स इतकी घसघशीत कमाई केली आहे. शिवाय सध्याचे चित्रपट पहिल्या आठवडय़ानंतरच थिएटरमधून गायब होताना दिसतात. अशा वेळी ‘ग्रॅव्हिटी’ने मात्र तिसर्‍या आठवडय़ापर्यंत दम टिकवला. ऑक्टोबर 2013 मध्ये ‘ग्रॅव्हिटी’ मुंबईसह भारतभरात रिलीज झाला होता. दोन आठवडय़ात या सिनेमाने 23 कोटींची कमाई केली. आपल्याकडे बॉलिवूडमध्ये सगळ्याच सिनेमांना शंभर कोटींच्या तुलनेत मोजलं जातं. त्यामुळे तेवीस कोटी हा आकडा फार छोटा वाटेल. मात्र कुठल्याही हॉलिवूड सिनेमासाठी भारतातली ही कमाई बरीच मोठी आहे.

वेबदुनिया वर वाचा