हनिमूनसाठी केले बेट आरक्षित

सोमवार, 8 सप्टेंबर 2014 (13:35 IST)
हॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर 23 ऑगस्टला फ्रान्समध्ये विवाह केला असून आता ही जोडी हनिमूनसाठी रवाना झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी माल्टामधील एक पूर्ण बेट रिकामे करून घेतले आहे. तेथील स्थानिकांना कांही दिवसांसाठी हे बेट सोडून जाण्यास सांगितले गेले असून त्यासाठी ब्रँजेलिना जोडीने 1 कोटी 20 लाख रूपये मोजले आहेत असेही समजते. ही जोडी काही काळ एकटेच राहण्याच्या विचारात आहे. त्यांच्या आगामी बाय द सी या चित्रपटाचे शूटिंग याच बेटावर केले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अँजेलिनाच करते आहे. अर्थात हनिमूनसाठी म्हणून हे बेट या जोडीने पसंत केले असले तरी अन्य कोणी नाही तरी त्यांची सहा मुले मात्र त्यांच्यासोबत तेथे असणार आहेत असेही सांगितले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा