ऑनेस्ट कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या जेसिकाची एकूण संपत्ती 1 हजार 263 कोटी रुपये आहे. तिने कंपनीची सुरुवात 2012 मध्ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचे मूल्य 6 हजार 317 कोटी रुपये पार केले आहे. हे सर्व केवळ तीन वर्षात घडले. कंपनी डायपर, वाइप आणि लहान मुलांचे वस्तूंचे उत्पादन घेते. फोर्ब्सने अमेरिकेच्या 50 सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत हॉलिवूडचे बियोन्स, फेसबुकच्या शेरील सेंडबर्ग आणि जज जूडीचाही समावेश आहे.