गायक-गीतकार एड शीरनच्या शोची सर्व तिकिटे केवळ तिन मिनीटांत विकल्या गेली आहेत. एडचा एक शो एक नोव्हेंबरला मेडिसीन स्क्वायर गार्डनमध्ये होणार आहे. या शोसाठीची सर्व तिकिटे फक्त तीन मिनीटांत विकल्या गेली आहेत.वेबसाइट ‘एसशोबिज डॉट कॉम’ च्या वृत्तानुसार २२ वर्षीय शीरनने हे वृत्त ट्विटरवर दिले आहे.या गायकाने ट्विट करून सांगितले मेडिसीन स्क्वायर गार्डनवर होणा-या पहिल्या शोला मिळणारा भरघोस प्रतिसाद लक्षात घेता आपण यानंतर त्याच ठिकाणी दुसरा शो करणार आहोत.