'वाका, वाका' नंतर विश्व चषकासाठी शकीराचे ‘ला ला ला’

शनिवार, 24 मे 2014 (14:40 IST)
दक्षिण आफ्रिकेत चार वर्ष अगोदर झालेल्या विश्व चषक फुटबॉलमध्ये ‘वाका वाका, दस टाइम फोर अफ्रीका’ गीतामुळे धूम मचावणारी पाप 
स्टार शकीराने आता ब्राझीलमध्ये होणार्‍या फुटबॉल महाकुंभासाठी नवीन गीत ‘ला ला ला (ब्राझील 2014) जारी करण्यात आले आहे.  
 
शकीराचे हे गीत फीफाच्या ‘वन लव, वन रिदम, फीफा विश्व कप 2014’ च्या व्यतिरिक्त या पाप स्टारच्या नवीन रिकॉर्डमध्ये आहे. येथे एका विज्ञप्तीनुसार  
या नवीन अल्बम ‘ला ला ला’ मध्ये या 37 वर्षीय गायिकेला काळ्या स्कर्टमध्ये नाचताना दाखवण्यात आले आहे. दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेसी, सेसे 
फेब्रीगास, एरिक एबिडाल, नेमार, जेम्स रोड्रिग्ज, सर्जियो एगुएरा आणि राडमल फालकाओशिवाय शकीराचे पुरूष मित्र गेर्राड पिक देखील अल्बमामध्ये 
दिसणार आहे.  
 
अल्बमामध्ये शकीरा आणि गेर्राडच्या 16 महिन्याच्याचा मुलगा मिलानला फुटबॉलवर किक मारताना दाखवण्यात आले आहे. ब्राझिली स्टार कार्लिनहोस 
ब्राउनच्या उपस्थितीत या गाण्याला सांबा टच देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा