हॉलीवूड गायिका आणि सिनेअभिनेत्री मायली सायरस 2013 ची वर्स्ट ड्रेस सेलिब्रेटी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या टाइम्स मॅग्झिनने मायलीला हा दर्जा दिला आहे. एमटीव्ही पुरस्कार वितरण सोहळमध्ये मायलीने परिधान केलेला ड्रेस सर्वाधिक घाणेरडा ड्रेसकोड ठरला. यासाठी एका खास पुरस्कार वितरण सोहळमध्ये मायलीचा गौरव केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमटीव्ही पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मायलीने परिधान केलेले कपडे चर्चा आणि विडंबनेचे विषय ठरले होते. प्रत्येक पुरस्कार वितरण सोहळ्यात मायली खूप तोकडे कपडे परिधान करते. त्यामुळे तिच्यावर अनेकदा टीकाही झाली आहे. वर्स्ट ड्रेस सेलिब्रेटीच्या यादीमध्ये किम कारदाशियानी ही दुसर्या स्थानी आहे. याप्रमाणेच गायिका केशा, टीव्ही स्टार जुलियन हॉग आणि जोशा मॅमट यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. ‘द हंगर गेम्स’ या हॉलीवूडपटाची नायिका जेनीफर लॉरेन्स हिला बेस्ट ड्रेस्ड सेलिब्रेटी हा पुरस्कार देऊन गौरविणत येणार आहे. हॉलीवूडच चित्रपट विश्वामध्ये ही सेलिब्रेटींची यादी महत्त्वपूर्ण मानली जाते. बर्याच नवोदित अभिनेत्री ड्रेसकोडच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिध्द करून घेण्यासाठी मुद्दामहून तोकडे कपडे घालतात. याच बळावर त्यांना चित्रपट मिळत असल्याचेही दिसून आले आहे.