माझ्यावरही बलात्कार झालाय; पामेलाचा गोप्यस्फोट

मंगळवार, 20 मे 2014 (10:51 IST)
अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल पामेला अंडरसन हिने स्वत:बाबत गोप्यस्फोट केला आहे. लहान वयात, तसेच किशोरवयात पामेलावर बलात्कार झाला होता. कान्समध्ये एका सामजिक कार्यक्रमात बोलताना पामेलाने हा धक्कादायक खुलासा केला.

पामेला म्हणाली, माले बालपण अतिशय संघर्षमय राहीले. आई-वडील प्रेमळ होते, मात्र मी सहा वर्षांची असताना एका दायीने लैंगिक छळ केला. नंतर बारा वर्षांच्या वयात तिच्यावर बलात्कार झाला. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सहाजणांकडून पामेलावर सामूहिक बलात्कार केला.

पामेलावर तिच्या बॉयफ्रेंडच्या 25 वर्षीय भावाने खेळण्याच्या निमित्ताने बलात्कार केला होता. त्यावेळी ती अवघ्या बारा वर्षांची होती. तसेच, त्यानंतर शाळेतील एका मित्राने गंमत म्हणून सहा मित्रांसह माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी मला पृथ्वीवरून अदृश्य व्हावेसे वाटत असल्याचा भावना पामेलाने व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा