पॉप स्टार गायिका ब्रिटनी स्पीयर्सने आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन 'सोशल नेटवर्किंग साइट्स'वर केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काढलेले काही फोटो तिने विविध 'सोशल नेटवर्किंग साइट्स'वर अपलोड केले आहेत.
पीपल मॅग्झीनने दिलेल्या बातमीनुसार, 'एक्स फॅक्टर'ची जज 30 वर्षीय ब्रिटनीने 'फेसबुक', 'ट्विटर' आणि 'पिंटेरेस्ट'वर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात कॅलिफोर्नियाची एक ग्लॅमरस मुलगी दिसत आहे. या फोटोत ब्रिटनी बिकिनीत दिसत आहे. दोन मुलांची आई असलेल्या ब्रिटनीने फोटोच्या खाली लिहिले आहे, की 'कोणाला असे का वाटेल, की गरमीचे दिवस संपावेत, मला तरी असे वाटत नाही.'