नग्न फोटोच्या प्रकाशनावर जस्टिनने दिली धमकी

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (12:45 IST)
पॉप स्टार जस्टिन बीबरने एका मीडिया संस्थेला बोरा बोरामध्ये सुट्या घालवताना घेण्यात आलेल्या त्याच्या नग्न फोटोला छापण्याबद्दल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.  
 
हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या फोटोंचे ऑनलाईन प्रसारण झाल्यानंतर बीबरच्या कायद्या सल्लागाराने प्रकाशकाला एक ‘उल्लंघन पत्र’ पाठवले आहे.  
 
पत्रात लिहिले आहे की, ‘आम्हाला नुकतीच ही माहिती मिळाली आहे की तुमच्या कंपनीने या चित्रांना मिळवले आहे आणि ते आमच्या ग्राहकांना बीबरचे अनाधिकृत आणि नग्न फोटे पाठवत आहे.’ उल्लंघन पत्रानुसार बीबरच्या कायदा सल्लागार टीमने 12 तासाच्या आत प्रकाशनाला आपली वेबसाइटहून या फोटोला काढण्याचे आदेश दिले आहे.   (भाषा) 

वेबदुनिया वर वाचा