दीपिकासोबत काम करण्यास उत्सुक आहे विन डीजल

शुक्रवार, 29 जानेवारी 2016 (15:46 IST)
हॉलिवूडचे अॅक्शन स्टार विन डीजल लवकरच दीपिका पादुकोणसोबत चित्रपट ‘एक्सएक्सएक्स : द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ मध्ये दिसणार आहे. डीजलचे म्हणणे आहे की दीपिकासोबत काम करण्यासाठी ते फारच उत्सुक आहे.   
 
डीजलची ‘फ्यूरियस-7’मध्ये दीपिकाचे काम करणे निश्चित झाले होते पण वेळ नसल्यामुळे ते काही शक्य झाले नाही. पण आता 48 वर्षीय डीजलने एका व्हिडिओत खुलासा केला आहे की शेवटी ते ‘बाजीराव मस्तानी’ची अदाकारा दीपिकासोबत काम करत आहे आणि त्यासाठी ते फारच उत्सुक आहे.  
 
डीजल यांनी म्हटले की तुम्ही दीपिकाबद्दल ऐकलेच असेल, त्यांना बर्‍याच वेळेपासून तिच्यासोबत काम करायचे होते. त्यांचे म्हणणे आहे की बॉलीवूडमध्ये वेग वेगळ्या संस्कृतीचे संगम आहे आणि त्यासाठी ते फारच उत्सुक आहे. त्यांचे मानणे आहे की दीपिकाची भूमिका जगाला दिवाना करून देईल.  
 
या अगोदर दीपिकाने म्हटले होते की हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ती फारच उत्साहित आहे तेवढीत घाबरलेलीही आहे. येणार्‍या या चित्रपटाचे निदर्शन डी. जे. कारूसो करणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा