किमने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा

सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (09:53 IST)
हॉलिवूड रिअँलिटी स्टार किम कर्दाशिअनने पुन्हा एकदा बोल्डनेस सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हो खरंच, तिने स्वत:ची काही न्यूड छायाचित्रे इंस्टाग्रामवर अपलोड केली आहेत. या फोटोंमुळे हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. कारण किम प्रेग्नेंट आहे, तरीदेखील ती विवस्त्र झाली आहे. 
 
किमने यापूर्वीसुद्धा अनेकदा असे न्यूड फोटोशूट केले आहेत. किमने हा फोटो अफवांवर पूर्णविराम लागावा म्हणून पोस्ट केली आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, की किम प्रेग्नेंट आहे, की नाही? या विषयाला थांबवण्यासाठी किमने असे फोटो पोस्ट केले आहेत. तिने फोटो पोस्ट करून लिहिले, ‘प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते आणि प्रत्येकीची गर्भावस्थासुद्धा वेगळी असते. मी प्रत्येकवेळी शरीरावर प्रेम करणे शिकले आहे.’ किमने सांगितले, की दुसर्‍यांदा आई होणार आहे. 
 
तिला दुसर्‍यांदा प्रेग्नेंट होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मात्र ती आता प्रेग्नेट आहे, यासाठी ती देवाचे आभार मानते. किम यापूर्वीसुद्धा अनेकदा अशा बोल्ड पोजमध्ये दिसली. तिने अनेक मासिकांसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा