ऑस्कर पुरस्कार वितरण : '12 इयर्स अ-स्लेव' ठरला सर्वोत्कृष्ट

सोमवार, 3 मार्च 2014 (18:42 IST)
86 व्‍या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात '12 इयर्स अ-स्लेव' ने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान मिळवला. तर  'ग्रॅव्हटी' आणि 'अमेरिकन हसल'ला प्रत्येकी दहा दहा पुरस्कार पटकावले. या तिन्ही सिनेमात यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात चांगलीच रस्सीखेच झाली. 
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटॉग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स, एडिटींग, साऊंड मिक्सिंग आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर या 
पुरस्कारांवर 'ग्रॅव्हटी'ने आपले नाव कोरले आहे. अल्फान्सो क्युरॉन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. लॅटीन दिग्दर्शकाने पहिल्यांदाच 
ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.
 
'12 इयर्स अ-स्लेव' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला असला तरीदेखील 'ग्रॅव्हटी'ने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर मोहोर उमटवली आहे. तब्बल सात पुरस्कार 'ग्रॅव्हटी'ने आपल्या नावी केले. या सिनेमाला एकुण आठ नामांकन मिळाली होती. त्यापैकी सात पुरस्कारांवर ग्रॅव्हटीने आपले नाव कोरले. 
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लँचेटने आपल्या नावी केला. 'ब्लू जास्मिन' या सिनेमासाठी केटला हा पुरस्कार मिळाला. तर 'डल्लास बायर्स क्लब' या सिेनेमातील भूमिकेसाठी अभिनेता मॅथ्यू मॅककोनाऊगे हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. 
 
लॉस एंजेलिसच्‍या डॉल्‍बी सभागृहात हा सोहळा रंगला. ऑस्कर 2014ची सुरुवात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्काराने झाली. 
 
ऑस्‍कर विजेत्‍यांची नावे
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता - मॅथ्यू मॅककोनाऊगे (डल्लास बायर्स क्लब)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - केट ब्लँचेट (ब्लू जास्मीन)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फोन्सो क्युरॉन (ग्रॅव्हटी)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले - स्पाईक जॉन्झ (हर)
सर्वोत्कृष्ट अडप्टेड स्क्रीनप्ले - जॉन रिडले (12 इयर्स अ स्लेव्ह)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - क्रिस्टन अँडरसन लोपेझ व रॉबर्ट लोपेझ (फ्रोझन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार - स्टीव्हन प्राइस (ग्रॅव्हटी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन - अल्फोन्सो क्युरॉन व मार्क सँगर (ग्रॅव्हटी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - इम्युनेल लुबेझ्की (ग्रॅव्हटी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लुपिटा न्याँग (12 इयर्स अ स्लेव्ह)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - जेअर्ड लेटो (डल्लास बायर्स क्लब)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनर - कॅथरीन मार्टिन (द ग्रेट गॅट्स्बी)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा पुरस्कार - अद्रुइथा ली व रॉबीन मॅथ्यू (डल्लास बायर्स क्लब)
सर्वोत्कृष्ट अॅनिमिटेड लघुपट - मि. हबलॉट (लॉरेन्ट विट्झ आणि अलेक्झांडर एस्पिगेअर्स)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - फ्रोझन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ग्रॅव्हटी
सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अॅक्शन) - हेलिअमबेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट - द लेडी इन नंबर 6: म्युझिक सेव्ह्ड माय लाईफ
बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - द ग्रेट ब्युटी (इटली)

वेबदुनिया वर वाचा