ऑस्करमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी

मंगळवार, 24 फेब्रुवारी 2015 (11:35 IST)
ऑस्कर पुरस्कारांत ‘बर्डमॅन’ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ८७ व्या ऑस्कर पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या बर्डमॅनचे अलेजान्द्रो इनारितू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 
 
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला. 
 
एडी रेडमायने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकाविला. ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ या चित्रपटात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ज्युलियन मूरला ह्यस्टिल अ‍ॅलाइसमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 
ऑस्कर २०१५ चे मानकरी
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पॅट्रिशिया अर्क्वेट (बॉयहूड)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - जे.के. सिमन्स (विप्लश)
 
सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) - ईडा (पोलंड)
 
सर्वोत्कृष्ट माहितीपट - क्रायसिस हॉटलाइन : व्हेटरन्स प्रेस वन 
 
सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म - द फोन कॉल 
 
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - फिस्ट
 
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - बिग हिरो ६

वेबदुनिया वर वाचा