एक अरब वेळा बघण्यात आला शकीराचा हा व्हिडिओ

बुधवार, 27 जानेवारी 2016 (17:03 IST)
कोलंबियाई सुपरस्टार शकीराचे प्रसिद्ध गीत 'वाका वाका'ने यू ट्यूबवर एक अरबाचा आकडा पार केला आहे. 
 
'वाका वाका' 2010 फीफा विश्व कपाचा आधिकारिक थीम साँग होता. या गाण्याच्या माध्यमाने शकीरा तिसरी लातीन अमेरिकी कलाकार बनली आहे. शकीराच्या आधी ब्रूनो मार्स, मार्क रॉनसन आणि एनरिक इग्लेसियसला हा मान मिळाला आहे. 
 
शकीराने ट्विट केले, वाह, वाका वाकाला एक अरबापेक्षा जास्त लोकांनी बघितले. हे गीत आणि व्हिडिओ ज्याने माझे जीवनच बदलून दिले. 
 
या व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान 2010मध्ये शकीराची भेट तिचा प्रियकर आणि प्रसिद्ध फुटबॉलर गेरार्द पिकशी झाली होती. शकीरा आणि गेरार्दचे दोन मुलं मीलान आणि साशा आहे.

वेबदुनिया वर वाचा