बॉलिवूडची बिंदास गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन टेलिव्हिजन सिरियल ‘क्वांटिको’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘क्वॉन्टिको’चा टिझर रिलीज झाला आहे.
अवघ्या 14 सेकंदाच्या या टिझरमध्ये फक्त प्रियांका चोप्राच दिसते. प्रियांकाने ‘क्वॉन्टिको’मध्ये एका युवा एफबीआय एजंट एलेक्स पॅरिशची भूमिका साकारली आहे. यापूर्वी प्रियांकाने ट्विटरवर ट्रेलर अपलोड करुन याबाबत माहिती दिली होती.
जॅक मॅकलोगनलीन, डोग्रे स्कॉट आणि औनजानू एलिसही या सिरियलमध्ये सहभागी होणार आहेत. ‘गॉसिप गर्ल’मध्ये काम करणारी जोश साफरानने या सिरियलची पटकथा लिहिली आहे, तर मार्क मुंडेन यांनी दिग्दर्शन केले आहे.
एफबीआयच्या युवा सदस्यांच्या ग्रुपची ‘क्वॉन्टिको’ची कथा आहे. व्हर्जिनियामधील क्वांटिकोमध्ये प्रशिक्षणादरम्यान आपलं ध्येयं गाठण्यासाठी संघर्ष करणार्या एफबीआयच्या सदस्यांवर आधारित या मालिकेचं कथानक फिरतं.