हॉलिवूड सुंदरी लिंडसे लोहान ही खूप काम केल्यामुळे थकून गेली आहे. मी आता खूप दमली आहे, असे लिंडसे लोहानचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात लिंडसे हॉटेलच्या आपल्या रूममध्ये भोवळ येऊन पडली होती.
25 वर्षीय लिंडसेची प्रकृती सध्या खूपच बिघडलेली आहे. डॉक्टरांच्या मते, लिंडसेची तब्येत गंभीर असून, कोड थ्रीशी संबंधित आहे. एका वेबसाईटच्या मते, कोड थ्री, जीवनाच्या धोक्याला दर्शवतो. लिंडसेने आपल्या तब्येतीविषयी गंमतीत ट्विट केले, चार दिवसांमध्ये 85 तास काम केल्यानंतर काय होणार आहे. आपल्याला स्वत:च्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायची गरज आहे, नाही तर एक दिवस या जगातूनच गायब होण्याची वेळ येईल.