हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने तिच्या सामाजिक संस्थेमार्फत अफगाणिस्तानमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक शाळा उघडली आहे. अँजेलिन ही तिच्या संस्थेमार्फत मुलींसाठी मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. काबूलमध्ये तिने नुकतीच शाळा उघडली असून, या शाळेमधील 300 विद्यार्थ्यांचा खर्च ती उचलणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तिने आतापर्यंत अनेक शाळा सुरू केल्या आहेत, मात्र या शाळेमदील विद्यार्थ्यांचा शंभर टक्के खर्च ती एकटी करणार आहे, असे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. जोली म्हणाली, मी माझ्या क्षेत्रामध्ये कामाचा मनमुराद आनंद घेत आहे, मात्र समाजासाठी काहीतरी केल्याने त्या कामाचा मोठा आनंद मिळतो. अफगाणिस्तानमधील लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची नेहमीच इच्छा असते. यामुळेच शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.