या दिवशी सात्विक आहार घेतला जातो. लसूण, कांदा, मास-मटण, अंडी वर्ज्य असते. तसेच तांदळापासून बनवलेले पदार्थही या दिवशी वर्ज्य असतात.
एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असले तितके व्रत सात्विक मानले जाते. तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते. जलावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते. यामुळे मन अधिक विचलित अथवा चंचल होते. यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भिती असते. एकादशीचे व्रत करताना मन निग्रही असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाहीत.