पण रामायणाच्या बाबतीत एक मत अजून प्रचलित आहे म्हणजे सर्वात आधी रामायण हनुमानाने लिहिली होती, नंतर महर्षी वाल्मीकीने संस्कृत महाकाव्य 'रामायण'ची रचना केली होती. रामायणानंतर श्रीराम कथेला बर्याच भाषेत रामायण किंवा याच्या समकक्ष नावांनी लिहिण्यात आले. हनुमानाने याला शिलेवर लिहिले होते. ही रामकथा वाल्मीकीच्या रामायणाच्या अगोदर लिहिण्यात आली होती आणि 'हनुमन्नाटक'च्या नावाने प्रसिद्ध आहे. या प्रकारे श्रीराम आज देखील जगात बर्याच रामायणाच्या माध्यमाने जिवंत आहे आणि नेहमी राहतील.
रामायण अद्याप अन्नामी, बाली, बंगला, कम्बोडियाई, चीनी, गुजराती, जावाई, काश्मिरी, खोटानी, लाओसी, मलेशियाई, मराठी, ओडिया, प्राकृत, संस्कृत, संथाली, सिंहली, तमिळ, तेलगू, थाई, तिंबती, कावी इत्यादी भाषांमध्ये लिहिण्यात आली आहे.