सत्यनारायण कथा मराठीत्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला." नारद म्हणाले, "ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो." नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, "मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन." नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत." नारद म्हणाले, "हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे." भगवान् म्हणतात, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. या खेरीज अनेक प्रांतात सत्यनारायणाच्या विविध कथा प्रचलित आहेत. ते व्रत म्हणजेच सत्यनारायण पूजा व व्रत कथा.