विदुर नीती : या 4 लोकांच्या घरात कधी बरकत नसते

सोमवार, 28 डिसेंबर 2020 (09:15 IST)
विदुर एक बुद्धिजीवी होते म्हणून त्यांच्या नीतींना आणि विचारांना लोक अवलंबतात आणि मानतात. विदुर नीतीमध्ये अशा लोकांबद्दल देखील सांगितले आहे ज्यांच्या घरात बरकत राहत नाही. असं म्हणतात की या लोकांना आई लक्ष्मी कधी कृपा करत नाही. विदुर नीतीनुसार अशा लोकांचे सर्व आयुष्य पैशाच्या अभावी निघते.
 
1 स्वच्छता न करणारे लोक - 
असे म्हणतात की ज्या लोकांच्या घरात स्वच्छता करत नाही त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास होत नाही. अस्वच्छतेमुळे अशा लोकांच्या घरात बरकत राहत नाही. म्हणून घरात स्वच्छता राखली पाहिजे.
 
2 पूजा पाठ - 
असे म्हणतात की ज्या घरात पूजा केली जाते,त्या घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी बनलेली राहते. घरात पूजा केल्याने आई लक्ष्मीचा वास असतो. ज्या मुळे घरात सुख समृद्धी राहते.
 
3 वडिलधाऱ्यांचा  सन्मान - 
विदुर नीतीच्यानुसार, ज्या घरात मोठ्यांचा आणि वडिलधाऱ्यांचा सन्मान केला जातो, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. जे लोक आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान करतात आणि वाईट शब्द बोलतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. ज्योतिषाचार्यानुसार, ज्या घरात वडीलधारी आनंदी असतात तेथे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आई लक्ष्मी तिथे वास करते.
 
4 शब्द जपून वापरा -
विदुरनीतीनुसार, जे लोक शब्दांना जपून वापरतात. त्या घरात आई लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहतो. विदुरजी म्हणतात की जे लोक काहीही विचार न करता वाईट शब्दांचा वापर करतात, त्यांना आई लक्ष्मीचे आशीर्वाद कधी ही मिळत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती