वसंत पंचमी शुभ मुहूर्त : Shubh Muhurat बघून करा vasant panchami च्या दिवशी सरस्वती पूजन

सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (12:31 IST)
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वर्ष 2021 मध्ये वसंत पंचमी शुभ मुहूर्त 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 3 वाजून 36 मिनिटापासून सुरु होऊन 17 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 5.46 पर्यंत राहील. या निमित्ताने रेवती नक्षत्रात अमृत सिद्धी योग व रवी योग यात सरस्वती देवीची पूजा केली जाईल. यात अभिजीत मुहूर्त 11.41 ते दुपारी 12.46 पर्यंत असेल.
 
वसंत पंचमी हा दिवस हिन्दू कॅलेंडरमध्ये पंचमी तिथीला साजरा केला जातो. ज्या दिवशी पंचमी तिथी सूर्योदय आणि दुपार या काळ दरम्यान असते त्या दिवशी सरस्वती पूजा केली जाते. हिन्दू पंचागाप्रमाणे सूर्योदय आणि दुपारचा मध्य काळ पूर्वाह्न नावाने ओळखला जातो.
 
वसंत पंचमीच्या दिवशी कोणत्याही वेळी पूजा केली जाते परंतू पूर्वान्ह हा काळ पूजेसाठी उत्तम मानला गेला आहे. सर्व शिक्षा केंद्र आणि विद्यालयांमध्ये पूर्वान्ह वेळेत सरस्वती पूजा करुन देवी सरस्वतींचा आशीर्वाद ग्रहण केला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती