Bhojan Shlok Marathi भोजन श्लोक

Bhojan Shlok Marathi अन्न कशा प्रकारे ग्रहण करावे याचंही एक शास्त्र आहे. आपण लहानपणी जेव्हा मुलं पंगतीत जेवायला बसायचे तेव्हा आई किंवा वडीलधारी मंडळी जेवणाआधी आपल्याला सावकाश होऊ द्या’असे म्हणता होते. तेव्हा जेवणात फास्ट फूड नसून वरण-भात, भाजी-पोळी, चटणी-कोशिंबीर, असे पदार्थ ताटात असायचे. हल्ली स्ट्रीट फूड खातो तसेच उभे राहून खाण्याची तर सोयच नसायची. ताट-पाट घेऊन खाली मांडी घालून पंगतीत बसण्याची पद्धत असायची. तसेच बाहेरुन आल्यावर हात-पाय धुवून ताटासमोर बसल्यावर लगेच खाण्यास सुरुवात होत नसायची. जेवणापूर्वी हात जोडून प्रार्थना होत असे. या खरंच खूप महत्त्व आहे. अन्नग्रहण म्हणजे एकाप्रकारे एक पवित्र यज्ञकर्म आहे अशात ते विनम्र व समाधानी असावे तसेच यासाठी देवाचे आणि निसर्गाचे आभार मानण्याची पद्धत होती.
 
भोजन श्लोक
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे 
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म 
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म॥
 
समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत - 
अर्थ : तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या. फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन (होम) होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात् परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नव्हे तर हे यज्ञकर्म समजून ग्रहण करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती