घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जातं. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
संस्कृत मध्ये नारळाला 'श्रीफळ' असे म्हटले जाते. श्री चा अर्थ लक्ष्मी असे. पौराणिक मान्यतेनुसार लक्ष्मीशिवाय कुठलेही शुभ कार्ये होत नाही आणि शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाच्या झाडाला संस्कृत मध्ये 'कल्पवृक्ष' असे ही म्हटले जाते. कल्पवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करते. पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो.