श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

मंगळवार, 19 मार्च 2024 (09:10 IST)
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि।
 
अर्थ- श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मन रुपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे.
 
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन-कुमार।
बल बुद्धी विद्या देहू मोहिं, हरहु कलेश विकार।  
 
अर्थ- हे पवन कुमार! मी आपलं सुमिरन करतो. माझं शरीर आणि बुद्धी निर्बल असल्याचं आपण तर जाणतात. मला शारीरिक बल, सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दु:ख आणि दोषांचे नाश करावे. 
 
**** 
जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुं लोक उजागर॥1॥
 
अर्थ- श्री हनुमान जी! आपला विजय असो. आपलं ज्ञान आणि गुण अथाह आहे. हे कपीश्वर! आपली जय असो. तिन्ही लोक, स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताल लोकात आपली कीर्ती आहे.
 
**** 
राम दूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा॥2॥
 
अर्थ- हे पवनसुत अंजनी नंदन! आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणी नाही.
 
**** 
महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी॥3॥
 
अर्थ- हे महावीर बजरंग बली! आपणात विशेष पराक्रम आहे. आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात.
 
**** 
कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुण्डल कुंचित केसा॥4॥
 
अर्थ- आपण सोनेरी रंग, सुंदर कपडे, कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात.
 
**** 
हाथबज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजै॥5॥
 
अर्थ- आपल्या हातात बज्र आणि ध्वजा आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे.
 
**** 
शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महा जग वंदन॥6॥
 
अर्थ- शंकराचे अवतार! हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसार भरात वंदना होते.
 
**** 
विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर॥7॥
 
अर्थ- आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात, गुणवान आणि अत्यंत कार्य कुशल होऊन श्री रामाचे काम करण्यास उत्सुक असतात.
 
**** 
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया॥8॥
 
अर्थ- आपण श्री राम चरित ऐकण्यात रस घेता. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृद्यात वास करतात.
 
**** 
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा, बिकट रूप धरि लंक जरावा॥9॥
 
अर्थ- आपण आपलं लहानसा रूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले.
 
**** 
भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज संवारे॥10॥
 
अर्थ- आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्री रामचंद्रांच्या उद्देश्यांना यश मिळवून दिले.
 
**** 
लाय सजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरषि उर लाये॥11॥
 
अर्थ- आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले.
 
**** 
रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई॥12॥
 
अर्थ- श्री रामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावाप्रमाणे आहात.
 
**** 
सहस बदन तुम्हरो जस गावैं। अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥13॥
 
अर्थ- श्रीरामाने आपल्या हे म्हणत हृदयाशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे सारखे आहे.
 
**** 
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा,  नारद, सारद सहित अहीसा॥14॥
 
अर्थ-  श्री सनक, श्री सनातन, श्री सनन्दन, श्री सनत्कुमार आदि मुनी ब्रह्मा आदि देवता नारद, सरस्वती, शेषनाग सर्व आपले गुणगान करतात.
 
**** 
जम कुबेर दिगपाल जहां ते, कबि कोबिद कहि सके कहां ते॥15॥
 
अर्थ- यमराज, कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही.
 
**** 
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा॥16॥
 
अर्थ- आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले, ज्यामुळे ते राजा झाले.
 
**** 
तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेस्वर भए सब जग जाना॥17॥
 
अर्थ- आपल्या उपदेशांचे विभीषणाने पालन केलं ज्याने ते लंकेचे राजा झाले, हे सर्व जगाला माहिती आहे.
 
**** 
जुग सहस्त्र जोजन पर भानू, लील्यो ताहि मधुर फल जानू॥18॥
 
अर्थ- सूर्य अती दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोहचण्यास हजार युग लागतात. अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेला.
 
**** 
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि, जलधि लांघि गये अचरज नाहीं॥19॥
 
अर्थ- आपण श्री रामचंद्राची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं, यात आश्चर्य करण्यासारखं नाही.
 
**** 
दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥20॥
 
अर्थ- संसारात जितकेही अवघड काम असलं तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जातं.
 
****
राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसा रे॥21॥
 
अर्थ- श्री रामचंद्राचे दारावरील आपण राखणदार आहात, ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही अर्थात आपल्या प्रसन्न केल्याशिवाय राम कृपा दुर्लभ आहे.
 
****
सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना ॥22॥
 
अर्थ- आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतं, आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही.
 
****
आपन तेज सम्हारो आपै, तीनों लोक हांक तें कांपै॥23॥
 
अर्थ- आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही, आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात.
 
****
भूत पिशाच निकट नहिं आवै, महावीर जब नाम सुनावै॥24॥
 
अर्थ- जेथे महावीर हनुमानाचे नाव घेतलं जातं तेथे भूत-पिश्शाच जवळ देखील फिरकत नाही.
 
****
नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा ॥25॥
 
अर्थ- वीर हनुमान ! आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीश्या होतात.
 
****
संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै॥26॥
 
अर्थ- हे हनुमान ! विचार, कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करतात.
 
 
****
सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा॥27॥
 
अर्थ- तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे.
 
****
और मनोरथ जो कोइ लावै, सोई अमित जीवन फल पावै॥28॥
 
अर्थ- ज्यांच्यावर आपली कृपा असते, त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फल प्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकतं नाही.
 
****
चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा॥29॥
 
अर्थ- चारी युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे, जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे.
 
****
साधु सन्त के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे॥30॥
 
अर्थ- हे श्रीरामाचे लाडके! आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश.
 
****
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, अस बर दीन जानकी माता॥31॥
 
अर्थ- आपल्याला देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे, ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकतात.
 
1.) अणिमा- ज्यात साधक कोणालाही दिसत नाही आणि अवघड ते अवघड पदार्थांत प्रवेश करतो.
2.) महिमा- ज्यात योगी स्वत:ला खूप मोठं बनवतो.
3.) गरिमा- ज्यात साधक स्वत: वजनदार बनवू शकतो.
4.) लघिमा- ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो.
5.) प्राप्ती- ज्यात इच्छित पदार्थाची प्राप्ती होते.
6.) प्राकाम्य- ज्याने इच्छेनुसार पृथ्वीत सामावू शकतात, आकाशात उडू शकतात.
7.) ईशित्व- ज्याने सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं.
8.) वशित्व- ज्यात दुसर्‍यांना वश करता येतं.
****
राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपति के दासा॥32॥
 
अर्थ- आपण निरंतर श्री रघुनाथाच्या शरणात राहतात, ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारापणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे.
****
तुम्हरे भजन राम को पावै, जनम जनम के दुख बिसरावै॥33॥
 
अर्थ-आपलं भजन केल्याने श्री राम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतराचे दु:ख दूर होतात.
****
अन्त काल रघुबर पुर जाई, जहां जन्म हरि भक्त कहाई॥34॥
 
अर्थ-आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम, अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं आणि जिथे जन्म मात्र हरि भक्तच्या रूपात मिळतो.
****
और देवता चित न धरई, हनुमत सेई सर्व सुख करई॥35॥
 
अर्थ-हे हनुमान ! आपली सेवा केल्याने सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होतात, मग इतर देवतांची गरज भासत नाही.
****
संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा॥36॥
 
अर्थ- हे वीर हनुमान ! आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीश्या होतात.
****
जय जय जय हनुमान गोसाईं, कृपा करहु गुरु देव की नाई॥37॥
 
अर्थ-हे स्वामी हनुमान ! आपली जय असो, जय असो, जय असो! आपली माझ्यावर कृपालु श्री गुरुसमान कृपा असावी.
 
****
 
जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बंदि महा सुख होई॥38॥
 
अर्थ- शंभर वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल.
****
जो यह पढ़ै हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा॥39॥
 
अर्थ-भगवान शंकर साक्षी आहे की याचे पाठ केल्याने  सर्व मनोकामना पूर्ण होतील, निश्चित यश प्राप्ती होईल.
****
तुलसीदास सदा हरि चेरा, कीजै नाथ हृदय मंह डेरा॥40॥
 
अर्थ-हे नाथ हनुमान ! तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे. म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा.
****
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सूरभूप॥
 
अर्थ-हे संकट मोचन पवन कुमार! आपण आनंद मंगळ स्वरूप आहात। हे देवराज! आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती