प्राचीन काळात मृत्युलोकात एक ब्राह्मणी राहत होती. ती नेहमी व्रत करत असे. एकेकाळी ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले. ती अत्यंत हुशार असूनही, तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते. यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करुन आपलं शरीर शुद्ध केले आहे तर आता तिला विष्णुलोकात जागा तर मिळेल परंतू हिने कधी अन्न दान न केल्यामुळे ही तुप्त होणे अवघड आहे.
यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला. मी स्वर्ग लोकात परतून आलो.
काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करुन स्वर्ग आली. तेव्हा ब्राह्मणीला माती दान केल्यामुळे स्वर्गा सुंदर महाल मिळाले परंतू आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत, पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही, यामागील कारण आहे तरी काय?
यावर मी तिला म्हटले की- आधी तु आपल्या घरी जा. देव स्त्रियां तेथील येतील तुला बघायला. आधी त्यांच्याकडून षटतिला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड. माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली. जेव्हा देव स्त्रियां आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करु लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली- आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षटतिला एकादशीचे माहात्म्य सांगा.