सत्यनारायण कथा करण्यामागील कारण

सोमवार, 28 जून 2021 (10:33 IST)
प्रत्येक घरात सत्यनारायण कथा आयोजित केली जाते. सत्यनारायण कथा काय आहे आणि कथा करण्यामागील कारण काय हे जाणून घ्या - 
 
1. सत्यनारायण व्रत कथा ही भगवान विष्णूच्या वास्तविक स्वरूपाची कहाणी आहे.
 
2. सत्यनारायण व्रत कथा स्कंद पुराणातील रेवाखंड येथून संकलित केली आहे.
 
3. सत्यनारायण व्रत कथेचे दोन भाग आहेत - व्रत-उपासना आणि कथा ऐकणे किंवा पाठ करणे.
 
4. या कथेत दोन मुख्य विषय आहेत - संकल्प विसरणे आणि प्रसादाचा अपमान करणे.
 
5. ही कहाणी बर्‍याचदा कुटुंबात पौर्णिमेच्या दिवशी, गुरुवारी किंवा विशेष सणानिमित्त आयोजित केली जाते.
 
6. नारायणच्या रूपाने सत्याची उपासना करणे आणि नारायण यांना सत्य मानणे, हे सत्यनारायण आहे. सत्य यात संपूर्ण जग समाहित आहे इतर सर्व माया आहे.
 
7. सत्यनारायण कथेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये छोट्या कथांच्या माध्यमातून सांगितले आहे की आपण सत्याचा अवलंब न केल्यास कोणती समस्या उद्भवते आणि कशाप्रकारे प्रभु नाराज होऊन शिक्षा देतात आणि प्रसन्न होऊन बक्षीस देतात हे या कथेचं केंद्र बिंदु आहे.
 
8. भगवान सत्यनारायणाच्या पूजेमध्ये खास करून केळीची पाने, नारळ, पंचफळ, पंचमृत, पंचगव्य, सुपारी, विड्याची पानं, तीळ, मोली, रोली, कुमकुम, तुळशी आवश्यक असतात. 
त्यांना प्रसाद म्हणून फळे, मिठाई आणि पांजरी अर्पण करतात.
 
9. उपवास व कथा ऐकून एखाद्याच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. ही कथा कुटुंबात अन्न, धन, सम्पन्नता आणि आपसात प्रेम व शांतीसाठी केली जाते. ही कथा गृहस्थ 
जीवनासाठी आवश्यक आणि शुभ मानली जाते. लग्नानंतर, संतान प्राप्तीनंतर आणि नवीन घरात प्रवेश केल्यावर या कथेचं आयोजन आवश्यक केलं जातं.
 
10. या कथेचा तिरस्कार किंवा उपहास एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणींना सुरुवात करतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती