Naikba Yatra 2025 ४ एप्रिल रोजी बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा पालखी सोहळा

गुरूवार, 3 एप्रिल 2025 (06:00 IST)
Satara Banpuri Naikba Yatra लाखो लोकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत श्री क्षेत्र नाईकबा देवस्थान हे पाटण तालुक्यातील ढेबेवाडीजवळ असलेल्या जाणुगडेवाडी व बनपुरी येथील उंच डोंगरावर वसलेले आहे. नाईकबा यात्रा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरी येथे आयोजित केली जाते. शिगाव नाईकबा यात्रा चैत्र महिन्यात (एप्रिल) आयोजित केली जाते. नाईकबा मंदिर मातृ शक्तीला समर्पित आहे. देवी शक्तीचा अवतार असलेल्या नाईकबा देवीची पूजा प्रामुख्याने या भागात केली जाते. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक येथे आयोजित पालखी सोहळ्यात सामील होतात. यंदा नाईकबा यात्रा ४ एप्रिल २०२५ रोजी आहे.
 
यात्रेदरम्यान देवी दुर्गेशी संबंधित विधी केले जातात. या प्रसंगी मंदिर दिवे, पाने, फुले इत्यादींनी सजवले जाते. या काळात अन्नदान देखील केले जाते.

महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी तिथीला किंवा चैत्र महिन्याच्या वाढत्या चंद्राच्या सातव्या दिवशी बनपुरी येथे नाईकबा यात्रा साजरी केली जाते. या दरम्यान भंडारा, देवाचे नाव जप/घोषणा, फटाके फोडणे, मनोरंजन आणि खेळाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
बनपुरी येथील डोंगरमाथ्यावर श्री नाईकबाचे मंदीर आहे. आख्यायिकेप्रमाणे जानुगडेवाडीतील कृष्णामाई गुरे चारण्यासाठी डोंगरावर जात होती. तेव्हा गुरांच्या कळपातील काळ्या रंगाची कपिला नावाची कालवड दररोज तिची नजर चुकवून दाट झाडीत जात असे. कृष्णामाईच्या ध्यानात आल्यानंतर एकदा तिने कपिलाचा पाठलाग केला तेव्हा बघितले की कपिला गाय एका मोठ्या शिलावर दुधाच्या धारा सोडत होती. त्याचवेळी तिला साक्षात श्री नाईकबा देवाचे दर्शन घडले. गुरे घेऊन घरी परत येताना तिला मोठा गडगडाट ऐकू आला. घाबरुन मागे वळून पाहता तिला शिला अंगावर येत असल्याचे जाणवू लागले. तेव्हा तिने शिलेला हाताने स्पर्श करताच ती शिला तेथे दुभंगली गेली. तेव्हा त्यातून श्री नाईकबा स्वयंभू शिव पिंडीसारखी मूर्ती प्रकटली.
 
दरवर्षी पालखी सोहळ्यात 'नाईकबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविक उपस्थितीत राहतात. पालखी, सासनकाट्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात येते. नाईकबाचा डोंगर गुलाबी रंगाने उधळून जातो. सासनकाठ्या वाद्यांच्या गजरात नाचवले जातात. तसेच सोहळ्यानंतर देवाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. दरम्यान संपूर्ण परिसर नाईकबा च्या नावानं चांगभलंच्या गजरात व भजनाने दणाणून जाते.
ALSO READ: रामनवमीला करा तुळशीच्या या युक्त्या, दारिद्र्य होईल दूर
कसे पोहोचायचे
सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे, जे १८३ किमी अंतरावर आहे.
सर्वात जवळचे सोयीस्कर रेल्वे स्टेशन सातारा आहे, जे ६८ किमी अंतरावर आहे.
सर्वात जवळचे प्रमुख शहर कराड आहे, जे १५ किमी अंतरावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती