त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले. पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. त्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.दैन्य, दारिद्ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. त्यांना मंदिरात प्रवेश न्हवता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगाच्या भक्तिरसात लीन झाले . संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाज बांधवांना दिला. ध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे 13व्या शतकात उदयास आली.