प्रबोधिनी एकादशीला तुळशीला 5 खास वस्तू अर्पित करा, तिजोरी नेहमी भरलेली राहील

Dev Uthani Ekadashi 2023 Tulsi Upay कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला खूप महत्त्व आहे. याला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउत्थान एकादशी देखील म्हटलं जातं. यंदा 2023 मध्ये प्रबोधिनी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. त्यानंतर सर्व प्रकारची शुभ आणि मंगल कार्ये सुरू होतात. देवउठणी एकादशीला तुळशीची पूजा करण्याची विशेष पद्धत सांगितली आहे. धनाची कमतरता दूर करण्यासाठी एकादशीला तुळशीला काय अर्पण केले जाते ते जाणून घेऊया.
 
गाठवलेला पिवळा धागा
प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या धाग्यात 108 गाठी बांधून तुळशीला बांधणे शुभ मानले जाते. एकादशीला हे काम जो कोणी करतो त्याला पैशाची कमतरता भासत नसते असे मानले जाते. धनाचे भंडार आणि तिजोरी नेहमीच भरलेली राहते.
 
लाल कापड
धार्मिक पद्धतीनुसार एकादशीला तुळशीला लाल कापड अर्पित केलं जातं. याने दांपत्य जीवनात गोडवा येतो आणि याशिवाय वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठीही हा उपाय प्रभावी असल्याचे सांगितले जाते. अशात तुमची इच्छा असल्यास एकादशीला तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करून तिचा आशीर्वाद मिळवू शकता.
 
कलावा किंवा लाल दोरा
ज्योतिष शास्त्रानुसार प्रबोधिनी एकादशीला तुळशीला लाल दोरा बांधणे शुभ असतं. असे केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
 
कच्चं दूध
प्रबोधिनी एकादशीला देवी लक्ष्मी आणि प्रभू विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती