या दिवशी महादेवाला दूध किंवा पाण्याने अभिषेक करावे.
मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक कष्ट सहन करावा लागत असेल तर कुलदेवतेची पूजा करावी.
यथाशक्ती तांदूळ, दूध, चांदी दान करू शकता.
चंद्रमा कष्टकारी असल्यास नदीत चांदी वाहल्याने सर्व कष्ट दूर होतील.
या दिवशी खीरचे सेवन करणेही शुभ असतं.
चंद्रमा नीच असल्यास व्यक्तीने पांढरे कपडे घालावे आणि पांढर्या चंदनाचा टिका लावावा.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना मनोभावे नमस्कार करावा.
एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ज्यांच्या कुंडलीत चंद्रमा षष्ठ भावात असेल त्यांनी दूध दान करू नये. द्वादश भावात असेल तर साधू संन्यासी लोकांना भोजन करवू नये.