Maruti Stotra मारुती स्तोत्र मराठी मध्ये

गुरूवार, 6 एप्रिल 2023 (09:20 IST)
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।
 
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।।
 
महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
 
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।
 
दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा।
 
पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।3।।
 
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
 
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।4।।
 
ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
 
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।5।।
 
ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती।
 
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।6।।
 
पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं।
 
सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।7।।
 
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू।
 
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।8।।
 
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
 
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।9।।
 
आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती ।
 
मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।10।।
 
अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे।
 
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।11।।
 
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके।
 
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।12।।
 
आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा ।
 
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।13।।
 
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।
 
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।14।।
 
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
 
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।15।।
 
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी।
 
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।16।।
 
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण।
 
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17।।
 
।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।
 
मारुती स्तोत्र जप पद्धत
मारुती स्तोत्राचे पठण हे सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करताना करावे.
यासाठी स्वतःला शुद्ध करावे.
हनुमानजींच्या मूर्तीसमोर बसावे.
हनुमानजींची विधिवत पूजा करुन पठण सुरु करावे.
फळप्राप्तीची इच्छा असल्यास 1100 वेळा पठण करावे.
पठण करताना चित्त एकाग्र असावे.
एका स्वरात, लयबद्ध पद्धतीने पठण करावे.
मोठमोठ्याने ओरडून पठण करु नये.
पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करू नये.
दारू, सिगारेट, तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये.
 
मारुती स्तोत्र पठणाचे फायदे Benefits of reciting Maruti Stotra Marathi
मारुती स्तोत्राचे पठण केल्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात.
मारुती स्तोत्राच्या पठणामुळे भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते आणि जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि शांती येते.
मारुती स्तोत्राचे पठण केल्याने हनुमान आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात.
मारुती स्तोत्राच्या पठण केल्याने जीवनात धन-धान्याची वृद्धी होते.
मारुती स्तोत्रमचे पठण केल्याने साधकाच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.
मारुती स्तोत्राच्या पठणाने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते.
मारुती स्तोत्राचे पठण केल्याने भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात.
मारुती स्तोत्राच्या पठणामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती