12 फेब्रुवारी रोजी कुंभ संक्रांती, या गोष्टी दान करा, सूर्याला अर्घ्य देण्याचे नियम जाणून घ्या
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 (16:47 IST)
Kumbh Sankranti 2025 : कुंभ संक्रांतीला सूर्य देव कुंभ राशित गोचर करतात. ज्याचे स्वामी शनी आहे. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा अर्चना केल्याने शुभ फल प्राप्ती होते. या दिवशी सकाळी जल अर्पित केले पाहिजे.
हिंदू पंचांगानुसार कुंभ संक्रांती 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या माघ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाईल. या दिवशी शुभ मुहूर्त दुपारी 12:35 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत असेल. 12 फेब्रुवारी रोजी, सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. हिंदू पंचागानुसार हा बदल रात्री 10:03 वाजता होईल. म्हणून उदयतिथीनुसार या वर्षी कुंभ संक्रांती 13 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.
कुंभ संक्रांती पुण्य आणि महापुण्य काल
हिंदू पंचांगानुसार कुंभ संक्रांतीच्या दिवशी पुण्य काल दुपारी 12:36 ते संध्याकाळी 6:10 पर्यंत राहील. तर महापुण्य काळ संध्याकाळी 4:19 ते 6:10 पर्यंत राहील. यावेळी कुंभ संक्रांतीला शुभ मुहूर्त 5 तास 34 मिनिटे आणि महापुण्य मुहूर्त 2 तास 51 मिनिटे असेल.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. वेबदुनिया कोणत्याही प्रकारच्या विश्वासाची किंवा माहितीची पुष्टी करत नाही. कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.