Kaal Bhairav Jayanti 2024: काल भैरव जयंती कधी आहे? पूजेची तारीख आणि पद्धत
रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (06:01 IST)
Kaal Bhairav Jayanti 2024: आता कार्तिक पौर्णिमेनंतरचा हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे काळभैरव जयंती. आणि काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काल भैरवाचा अवतार झाला होता. काल भैरव जयंती 23 नोव्हेंबर 2024 मध्ये शनिवारी साजरी केली जात आहे.
कालभैरव जयंतीचे दुसरे नाव कालाष्टमी आहे आणि या दिवशी भगवान शिवाचा उग्र अवतार असलेल्या कालभैरवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार काल भैरवांचा जन्म प्रदोष काळात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता, म्हणून याला भैरव अष्टमी असेही म्हणतात. या दिवशी व्याप्पिनी अष्टमीच्या मध्यरात्री कालभैरवाची पूजा करावी.