दीप व कापूर लावण्याचे महत्त्वाचे फायदे

बुधवार, 24 जून 2020 (16:33 IST)
दिव्याच्या वांतीचे प्रकार आणि लाभ-
कापसाची वात कापसाची वात सर्वत्र दिवा लावण्यासाठी वापरली जाते.
पांढरे कापड गुलाब पाण्यात बुडवून केलेली वात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पांढरे कापड गुलाब पाण्यात बुडवून सुकवले जाते व त्यानंतर त्याची वात केली जाते.
पिवळ्या साडीच्या वस्त्राची वात पती पत्नी मधील भांडण मिटवण्यासाठी लावली जाते.
कमळाच्या देठाची वात आनंदी व समृद्ध आयुष्यासाठी लावली जाते.
नवीन पिवळ्या वस्त्राची वात पार्वती देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लावली जाते.
नवीन लाल रंगाच्या वस्त्राची वात लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी लावली जाते.
केळ्याच्या खोडाची वात आपण केलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी व माफी मागण्यासाठी केळ्याच्या खोडाची वात बनवून दिवा लावला जातो.
 
कापूर लावणे
शास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही. 
कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. 
ज्या प्रकारे कापूर पूर्णपणे जळून जातं त्याप्रमाणे सर्व अशुद्धी आणि अहंकार सोडून स्वत:ला देवाच्या शरणी समर्पित करावे.
कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
कापराच्या धुराला स्पर्श करून मस्तक आणि डोळ्यांना लावणे म्हणजे देवाला प्रार्थना करणे की आमच्या विचार शुद्ध असावे.
 
वैज्ञानिक महत्त्व
कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात.
कापरामुळे वातावरण शुद्ध राहतं व आजार दूर राहतात.
पांढरं कापूर एक उत्तम अँटी ऑक्सिडेंटचं काम करतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती