मार्गशीर्ष महिन्यातील 10 वैशिष्ट्ये

मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:38 IST)
अघन महिना भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे, या महिन्यात शंखाची पूजा केल्यानं घराचे त्रास दूर होतात. अघनचा महिना सुरू होणार आहे. हिंदू पंचांगाच्यानुसार, याला मार्गशीर्ष महिना देखील म्हणतात. जरी प्रत्येक महिन्याचे आप -आपले वैशिष्टये असतात पण अघन किंवा मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्ट्या पवित्र मानला गेला आहे.
 
गीतेमध्ये स्वतः देवांनी सांगितले आहे की 
मासाना मार्गशीर्षोऽयम्। 
 
म्हणून या महिन्यात पूजा, उपासनेचे आपले महत्त्व आहे, चला जाणून घेऊ या काही वैशिष्ट्ये..
 
1 अघन महिन्याला मार्गशीर्ष म्हणवण्यामागील बरेच वाद आहे. भगवान श्रीकृष्णाची पूजा अनेक रूपात आणि अनेक नावांनी केली जाते. याच रूपात मार्गशीर्ष देखील श्रीकृष्णाचे एक रूप आहे.
 
2 सतयुगात देवांनी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीलाच वर्षाचे आरंभ केले.
 
3 मार्गशीर्षातील शुक्लपक्षाच्या द्वादशी पासून उपवास धरून तो प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला उपवास करून कार्तिक महिन्याच्या द्वादशीला त्याची पूर्णता करावी. प्रत्येक महिन्यातील शुक्लपक्षाच्या द्वादशीला भगवान विष्णूचे केशव पासून दामोदर पर्यंतच्या 12 नावांपैकी एक-एक नाव घेऊन त्यांची पूजा करावी. या मुळे उपासकाला मागील जन्माच्या घटना लक्षात येतात आणि तो त्या लोकात जातो जिथून तो परत कधीच येत नाही.
 
4 मार्गशीर्षाच्या पौर्णिमेला चंद्राची पूजा करावी, कारण या दिवशी चंद्राला अमृताने सिंचित केले होते. या दिवशी आई, बहिणी, मुलगी आणि कुटुंबातील इतर बायकांना एक-एक जोडी कपडे देऊन सन्मान केला पाहिजे. या महिन्यात नृत्य -गीताचे आयोजन करून उत्सव साजरा केला पाहिजे.
 
5 मार्गशीर्षाच्या पौर्णिमेलाच दत्त जयंती साजरी केली जाते.
 
6 मार्गशीर्षाच्या महिन्यात या 3 पवित्र पाठांचे महत्त्व आहे. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष. हे दिवसातून 2 ते 3 वेळा आवर्जून वाचावे.
 
7 या महिन्यात 'श्रीमदभागवत' ग्रन्थ बघण्याचे महत्त्व आहे. स्कंद पुराणात लिहिलेले आहे - की घरात जर भागवत असेल तर दिवसातून 2 वेळा त्याला नमस्कार करावा.
 
8 या महिन्यात आपल्या गुरूला, इष्टाला, ॐ दामोदराय नमः म्हणत नमस्कार केल्यानं आयुष्यातील सर्व अडथळे नाहीसे होतात.
 
9 या महिन्यात शंखामध्ये तीर्थाचे पाणी भरून घराच्या देवघरात देवांच्या वरून शंखमंत्र म्हणून फिरवा, नंतर हे पाणी घराच्या भिंतींवर शिंपडा. या मुळे घराची शुद्धी होते, शांतता नांदते आणि त्रास दूर होतात.
 
10 याच महिन्यात कश्यप ऋषींनी काश्मीर सारख्या सुंदर प्रदेशाची निर्मिती केली. याच महिन्यात महोत्सवाचे आयोजन करावे. हे खूप शुभ असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती