सकाळी तळहाताचे दर्शन घेणे शुभ

मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (10:06 IST)
सकाळच्या पहरी झोपेतून उठल्यानंतर आपण जर लांब असलेली वस्तू पाहिली तर आपल्या नाजूक डोळ्याना त्रास होतो व त्याचा विपरीत परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी दोन्ही तळ हाताचे दर्शन घ्यावे, असे ज्योतीषशास्त्रात आवर्जन सांगण्यात आले आहे. मानवाच्या जीवनावर चार पुरूषार्थांचा (धर्म, अर्थ, कर्म व मोक्ष) मोठा प्रभाव आहे. या पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी तळ हातांचे दर्शन घेऊन पुढील मंत्राचा एक वेळा जप केला पाहिजे. 
 
''कराग्रे वसती लक्ष्मी:, करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंद:,प्रभाते कर दर्शनम्।।'' 
काही वेळेच 'गोविंद' ऐवजी 'ब्रम्हा' असे ही उच्चारले जाते.
 
अर्थात:- 
तळ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी विद्यादात्री सरस्वती व मूळभागात (मनगटाची बाजू) गोविंद म्हणजेच ब्रम्हाचा निवास असल्याने त्यांच्या दर्शनाने आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रारंभ झाला पाहिजे. त्यामुळे चांगल्या फळाची अपेक्षापूर्ती होते. सकाळी उठल्यानंतर दिवसभरात आपल्या हातून शुध्द व सात्विक कार्य होण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तसेच आपण कुणावही विसंबून न राहता परिश्रम करून कर्म-फल-त्याग यांची भावना जागृत करत असते. मंत्र जाप करत असताना दोन्ही तळ हात एकमेकांवर घासून आपल्या चेहर्‍यावर लावले पाहिजे. असे केल्याने दिवसभरातील आपली सगळी कामे शुभ होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती