विवाह पंचमी : श्री राम-जानकी स्तुति वाचा, इच्छित जीवनसाथी मिळेल आणि नशीब उजळेल
मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (16:51 IST)
दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला विवाह पंचमी साजरी केली जाते. या दिवशी सीता आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा विवाह झाला होता. या दिवशी भगवान श्रीराम-देवी सीतेचं व्रत-पूजन, उपवास ठेवून मनपूर्वक, श्रद्धापूर्वक सीता- प्रभु श्रीरामाची उपासना केल्याने व्रत करणार्या जातकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
या दिवशी विवाह योग्य जातक शुद्ध मनाने पूजन करतात तर निश्चितच त्यांना योग्य जीवनसाथीदाराची प्राप्ती होते. इतकंच नव्हे तर विवाहितांच्या सौभाग्यात वृद्धी होते आणि सोबतच योग्य जीवनसाथीदार मिळतो. विवाह पंचमीला माता सीता आणि प्रभु श्रीराम यांची स्तुति अवश्य करावी-