Sankashti Chaturthi भालचंद्र संकष्टी चतुर्थी: या प्रकारे करा पूजा

मंगळवार, 30 मार्च 2021 (18:31 IST)
पौराणिक मान्यतेनुसार भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने विघ्नहर्ता गणेश भक्तांच्या सर्व समस्या नाहीसे करतात. भालचन्द्र संकष्टी चतुर्थी 31 मार्च बुधवारी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा अर्चना केली जाते. संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घ्या व्रत शुभ मुहूर्त व पूजा विधी....
 
भालचन्द्र संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त:
भालचन्द्र संकष्टी चतुर्थी बुधवार, 31 मार्च, 2021 चन्द्रोदय- रात्री 9 वाजून 39 मिनिटावर
चतुर्थी तिथी प्रारम्भ- 31 मार्च, 2021, गुरुवारी दुपारी 02 वाजून 06 मिनिटापासून
 
भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रत पूजा विधी:
भालचन्द्र संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे.
स्वच्छ वस्त्र धारण करावे.
देवघर स्वच्छ करावं.
व्रत संकल्प घ्यावा.
नंतर गणपतीच्या मूर्तीची पूजा-आराधना करावी.
त्यांना तीळ, गूळ, लाडू, मोदक, चंदन अर्पित करावं.
गणपतीची आरती करावी.
गणेश स्त्रोत पाठ करावं.
गणेश मंत्र जप करावा.
दिवसभर उपवास करावा.
संध्याकाळी गणपतीची पूजा करावी आणि नंतर चंद्र दर्शन झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे.
 
भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रताचं महत्व:
हिन्दू धर्माच्या मान्यतेनुसार भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलं आहे. धर्म शास्त्रानुसार गणपतीला प्रथम देवता मानलं गेलं आहे. म्हणून याच कारणामुळे प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी पूजा-अर्चना केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले गेले आहे. हे व्रत करणार्‍या जातकांच्या जीवनातील सर्व कष्ट आणि अडथळे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि आरोग्य प्राप्ती होते. याने सर्व प्रकाराचे संकट दूर होतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती