भगवान जगन्नाथ रथयात्रा : पौराणिक महत्व, प्राचीन कथा, खास गोष्टी
सोमवार, 12 जुलै 2021 (10:48 IST)
समुद्राच्या किनार्यावर वसलेल्या पुरी शहरात जगन्नाथ रथ यात्रा उत्सवाच्या वेळी दिसणारी आस्था आणि श्रद्धा यांचे भव्य वैभव आणि प्रदर्शन जगातील इतरत्र कोठेही दुर्लभ आहे. जगन्नाथ रथ यात्रा का काढतात यामागील भाविक आणि विद्वानांची वेगवेगळी मते आहेत.
एका आधुनिक श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा राजा रामचंद्रदेवाने यवानाच्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर इस्लाम स्वीकारला, तेव्हा मंदिरात त्यांना प्रवेश करण्यास मनाई होती, तेव्हा केवळ जगन्नाथांचा भक्त असल्यामुळेच हा प्रवास त्यांच्यासाठी काढून घेण्यात आला.
तर रथ यात्रेमागील पौराणिक मान्यता अशी आहे की स्नान पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच जगाच्या नाथ श्री जगन्नाथ पुरी यांचा ज्येष्ठ पौर्णिमेला वाढदिवस आहे. त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्यासह मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना रत्नसिंहसनाहून खाली आणले जाते आणि मंदिराजवळ स्नान मंडपात नेले जाते.
108 कलशांनी त्यांना शाही स्नान घातलं जांत. मग असे मानले जाते की या स्नानातून प्रभु आजारी पडतात आणि त्यांना ताप भरतो. मग 15 दिवस प्रभुंना एका खास खोलीत ठेवलं जातं. ज्याला ओसार घर म्हणतात. 15 दिवसांच्या कालावधीत मंदिराचे मुख्य सेवक आणि वैद्य यांच्याशिवाय कोणालाही महाप्रभु दिसणार नाही. या दरम्यान महाप्रभूंचे प्रतिनिधी अलारनाथ जी यांची मूर्ती मंदिरात स्थापित केली जाते आणि त्यांना पूजा केली जाते.
15 दिवसानंतर, भगवान बरे झाल्यानंतर खोलीतून बाहेर येतात आणि भाविकांना दर्शन देतात. ज्याला नव यौवन नैत्र उत्सव देखील म्हणतात. यानंतर, दुसर्या दिवशी, श्रीकृष्ण आणि मोठा भाऊ बलराम जी आणि बहीण सुभद्रासमवेत महाप्रभु महामार्गावर येऊन रथावर चढून शहर दौर्यावर निघतात.
जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेचे वैभव आणि सौंदर्य पाहण्यासारखे आहे. भगवान जगन्नाथच्या रथ यात्रेशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्याः
1 पुरीच्या रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रेसाठी तीन वेग वेगळे रथ तयार केले जाते. रथ यात्रेमध्ये सर्वात पुढे बलरामाचे रथ, मध्यभागी सुभद्रेचे रथ आणि सर्वात मागे भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचे रथ असतात. ते त्यांचा रंगाने आणि उंचीवरून ओळखलं जातं.
2 बलरामाच्या रथाला 'तालध्वज' म्हणतात, ह्याचा रंग लाल आणि हिरवा असतो. देवी सुभद्राच्या रथाला 'दर्पदलन' किंवा 'पद्मरथ' म्हणतात, हे काळे किंवा निळ्या आणि लाल रंगाचे असतं, भगवान जगन्नाथाच्या रथाला 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणतात. ह्याचा रंग लाल आणि पिवळा असतो.
3 भगवान जगन्नाथाचे नंदीघोष रथ 45.6 फूट उंच, बलरामाचे तालध्वज रथ 45 फूट उंच आणि देवी सुभद्रेचे दर्पदलन रथ 44.6 फूट उंचीचे आहे.
4 सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला 'दारू' म्हणतात. या साठी कडुलिंबाच्या निरोगी आणि शुभ झाडाची ओळख केली जाते. या साठी जगन्नाथ देऊळाची एक विशेष समिती बनविण्यात येते.
5 या रथांच्या निर्माणामध्ये कोणत्याही प्रकाराचे खिळे किंवा काटे किंवा इतर कुठल्याही धातूंचा वापर केला जात नाही. या रथांसाठी लागणाऱ्या लाकडांची निवड वसंत पंचमीच्या दिवसापासून केली जाते आणि रथाचे बांधकाम अक्षय तृतीयेपासून सुरू होतं.
6 हे तिन्ही रथ तयार झाल्यावर 'छार पाहणरा' नावाचा विधी करण्यात येतो त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालकीमध्ये येतात आणि तिन्ही रथांची विधिविधानाने पूजा करतात आणि 'सोन्याचा केरसुणी' ने रथ मंडप आणि मार्ग स्वच्छ केलं जातं.
7 आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते. ढोल, ताशे, रणशिंग आणि शंखांच्या आवाजात भाविक या रथाला ओढतात. असे म्हणतात की जे या रथाला ओढतात ते भाग्यवंत समजले जातात.
8 जगन्नाथ देऊळापासून रथयात्रा सुरू होऊन पुरी शहरातून होत हे रथ गुंडीचा देऊळात पोहोचतात. इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा सात दिवस विश्रांती घेतात. गुंडीच्या देऊळामध्ये भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला 'आडप- दर्शन' म्हटलं जातं.
9 गुंडीच्या देऊळाला गुंडीचं बाडी देखील म्हणतात. हे देवांच्या मावशीचे घर आहे. या देऊळाच्या विषयी आख्यायिका आहे की येथेच देव शिल्पी विश्वकर्मानी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवींच्या मूर्ती तयार केल्या.
10 आषाढ महिन्यातील दहाव्या दिवशी सर्व रथ परत देऊळाकडे परतीचा प्रवास करतात. रथांच्या परतीच्या या प्रवासाच्या विधीला बहुडा (बहुनाथ) यात्रा असे ही म्हणतात.