गणपतीला प्रथम पूजनीय देव मानले जाते आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचा उपास केला जातो. जेव्हा हा उपास मंगळवारी येतो तर त्याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्याच्या पत्रिकेत मंगलदोष असेल त्याला हा उपास नक्कीच करायला पाहिजे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली पाहिजे, ज्याने मंगल दोषाची शांती होऊन मंगल दोष दूर होण्यास मदत मिळते.