मृत्यूनंतर किती दिवसात मिळतो नवीन जन्म

एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की शंभर लोक शरीराचा त्याग करतात त्यातून किमान 85 लोक लगेचच अर्थात 35 ते 40 आठवड्याच्या आत जन्म घेतात. बाकी 15 टक्के लोकांमधून 11 टक्के लोकं एक ते तीन वर्षांच्या आत नवीन जन्म घेतात.  
 
बंगळूर स्थित स्पिरिचुअल सायंस रिसर्च फाउंडेशन(एसएसआरएफ)च्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे की चार टक्के आत्मेला बराच काळ वाट बघावी लागते. हे 400 वर्षांपासून 1000 आणि कधी कधीतर त्यापेक्षाही अधिक वर्ष ही असू शकतात.    
 
अशा आत्मेला जास्त वाट नाही बघावी लागत  
मरणार्‍या लोकांमध्ये 4 टक्क्यांना 300 ते 1000 वर्षांपर्यंत वाट बघावी लागू शकते. फाउंडेशनने हा अभ्यास मॅडम ब्लॅवट्स्की आणि लेड बीटर यांनी स्थापित केलेली थियोसोफिकल सोसायटीसोबत मिळून केला आहे.  
 
या अभ्यासात 85 टक्के लोकांना मृत्यू नंतर लगेचच गर्भ मिळून जातो. फाउंडेशननुसार याचे मुख्य कारण असे आहे की जास्तकरून आत्मा सामान्य शरीरधारी असते. आणि त्यांना नवीन जन्म घेण्यासाठी त्यांना वाट ही बघावी लागत नाही आणि त्यांना अडचणही होत नाही.  
 
विलक्षण आणि प्रतिभाशाली व्यक्तींच्या आत्मेला नवीन गर्भ घेण्यासाठी वाट बघावी लागते. कारण विलक्षण किंवा असाधारण आत्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना माध्यम बनवते. रिपोर्टमध्ये मागील 100 वर्षांमध्ये जन्म घेणार्‍या व्यक्तींचे जीवन, स्वभाव, सांगोपण आणि आई वडील यांच्या स्थितीबद्दल जाणून घेतले आहे.  
 
अशा आत्मेला बर्‍याच काळापर्यंत वाट बघावी लागते  
किमान दीड हजार दांपत्यांचा लावण्यात आलेल्या शोधात अभिजात्य, खाणारे पिणारे मध्यम वर्ग आणि साधारण स्तराच्या लोकांशिवाय अपराधी आणि साधू स्वभावाच्या व्यक्तींशी बोलण्यात आले. यातून किमान आठशे लोकांना मागील जन्माची स्मृती (पास्ट लाईफ मेमरी)मध्ये घेऊन जाण्यात आले.  
 
जे विवरण समोर आले त्यानुसार दोन टक्के लोक असे होते जे या तर खूंखार अपराधी होते किंवा संत महात्मा. यांना नवीन जीवन घेण्यासाठी थांबावे लागतात. व्यक्ती साधू असेल तर किंवा असाधू किंवा क्रूर असला तरी असतो तर तो असाधारणच.  
 
असाधारण व्यक्तींना नवीन शरीर आणि नवीन जन्म घेण्यासाठी उपयुक्त स्थिती आणि तसेच आई वडील असायला पाहिजे. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, नानक सारखे अवतारी महापुरुषांपासून रावण, कंस, अंगुलिमाल, मार, चंगेज खान, औरंगजेब सारखे क्रूर व्यक्तींचे उदाहरण आहे, जे आपले क्षेत्र आणि प्रवृतींमध्ये अन्यतम होते.  
 
म्हणून खास आत्मेला पुनर्जन्म घेण्यास वेळ लागतो  
संत महात्मा यांचे पूर्वजन्माचे वृत्तांत तर आज ही बघायला मिळतात. उदाहरण म्हणजे ओशो यांनी आपल्या प्रवचनात एकवेळा सांगितले होते की त्यांचा मागील जन्म 700 वर्ष जुना आहे.  

सातशे वर्ष आधी ते एक अनुष्ठान करत होते, अनुष्ठान पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर त्यांची हत्या झाली आणि सूक्ष्म शरीर उपयुक्त गर्भ शोधत राहिला.  

दुसर्‍यांदा जन्म घेण्याची स्थिती त्यांना 700 वर्षांनंतर मिळाली. असे म्हणतात की अनुष्ठानाचे तीन दिवस पूर्ण करण्यासाठी त्यांना या जीवनाच्या 21 वर्षांपर्यंत थांबावे लागले होते.  

एसएसआरएफच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की शरीर सुटले की नवीन जन्म मिळत नाही तर कर्मानुसार विभिन्न लोकात वेळ घालवावा लागतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती