1. साईबाबा दररोज मशीदीत दिवा लावत होते. यासाठी ते वाण्याकडून तेल मागत होते. परंतू एके दिवशी वाण्याने बाबांना म्हटले की माझ्याकडे तेल नाही. तेव्हा बाबा तेथून निघून मशीदीत आले आणि दिव्यात तेलाऐवजी पाणी घातलं आणि दिवा लावला. ही गोष्टी चारीकडे पसरली. नंतर वाण्याने तेथे येऊन माफी मागितली तेव्हा बाबांनी त्याला माफ करत म्हटले की 'आता कधीही खोटं बोलू नकोस.'
2. एकदा बाबांचा भक्त बर्याच लांबून आपल्या पत्नीसह बाबांचे दर्शन घ्यायला आला आणि तो निघणार तेवढ्यात मोठ्याने पाऊस पडाल लागला. भक्त परेशान होऊ लागला तेव्हा बाबांनी त्यांची परेशानी बघत म्हटले, ऐ अल्लाह! पाऊस थांबवा, माझ्या मुलांना घरी जायचे आहे आणि लगेच पाऊस थांबला.
3. एकदा गावातील एका व्यक्तीची मुलगी खेळता खेळता अचानक विहिरीत पडली. लोकांना वाटलं की ती बुडाली असेल. सर्व पळत तेथे पोहचले आणि बघितले तर ती हवेत अडकलेली होती. अदृश्य शक्तीने तिला धरलेले होते. ती अदृश्य शक्ती म्हणजे बाबा, कारण ती मुलगी म्हणायची की मी बाबांची बहीण आहे. अशात लोकांना अधिक पुरावा देण्याची गरजच उरलेली नव्हती.
4. म्हालसापतींकडे पुत्र झाला तेव्हा ते त्याला बाबांजवळ घेऊन आले आणि त्याचं नाव ठेवण्याचा आग्रह केला. बाबांनी पुत्राला बघून म्हटले की म्हालसापती याच्याशी आसक्त राहू नको. केवळ 25 वर्ष याला सांभाळ, तेवढेच खूप. ही गोष्ट म्हालसापतींना तेव्हा कळली जेव्हा त्यांच्या पुत्राचा वयाच्या 25 वर्षी मृत्यू झाला.
5. एके दिवस बाबांनी तीन दिवसासाठी आपलं शरीर सोडण्यापूर्वी म्हालसापतींना म्हटले की जर मी तीन दिवसात परत आलो नाही तर माझे शरीर अमुक जागेवर दफन करून द्याल. तीन दिवस तुम्हाला माझ्या शरीराची रक्षा करायची आहे. हळू-हळू श्वास बंद झाला आणि शरीराची हालचाल देखील. सर्वींकडे बातमी पसरली की बाबांचे देहांत झाले आहे. डॉक्टरांनी देखील तपासणी करून असेच सांगितले.
परंतू म्हालसापतींने सर्वांना बाबांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की तीन दिवस बाबांच्या शरीराची रक्षा करणे माझी जबाबदारी आहे. गावात या घटनेवर वाद देखील घडला परंतू म्हालसापतींनी बाबांचे डोके स्वत:च्या मांडीवर ठेवून तीन दिवसांपर्यंत जागरण केले. कोणालाही बाबांच्या शरीराला स्पर्श करू दिले नाही. तीन दिवसांनंतर जेव्हा बाबांनी पुन्हा शरीर धारण केले तेव्हा चमत्कारच झाला. सर्वांना खूप आनंद झाला.